संशोधन ...
संशोधन ... खूप आवश्यक आहे ... का ? प्लेग, देवी, पोलिओ, फ्लू ... काय न काय अश्या व्याधी ... एकेकाळी मृत्यूतांडव घडविलेले साथीचे रोग आज दिसायलाही मिळत नाहीत ... संशोधनाचीच कृपा आहे ...
असं म्हटल्या जात की, जगाचा अंत होणार. सध्या तर कोरोना याचा क्लायमॅक्स दाखवतंच आहे जणू. पण विश्वास ठेवा, एक - दोन वर्षातच येणाऱ्या लशी या काही चमत्काराशिवाय कमी नाहीतच. आणि चमत्कार कुणाचा ... माणसाचा ...
हे मान्य आहे की येणाऱ्या दिवसांत आपण कदाचित वाईट दिवस बघू शकतो ... पण त्यावर मनुष्य स्वतःच उपाय काढेल ... यातही शंका नाही, कारण असे कित्येक तरी उदाहरणे आहेत. कित्येक दुष्काळ, महामारी, बघितलेले काही वृद्ध अजूनही जेव्हा त्यांच्यावरची आपबिती सांगतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यामानाने आपण खूपच भाग्यवान आहोत. त्या काळाचा जर विचार केला तर हा काळ खूपच स्थिर आयुष्य देणारा आहे. जगात संकट नेहमीच येत राहिली, पण माणसाने प्रयत्न सोडले नाहीत, सोडणार नाही. आजपर्यंतचा हा जगाचा प्रवास हेच दर्शवितो.
अहो, चंद्रावर जागा घेतायतं लोकं ... १०० वर्षांपूर्वी हा विचार तरी असेल का ? पण तेच आज माणसानेच सत्यात आणलंय ... श्रीकृष्णाने श्रीमद भगवदगीतेत सांगितलंय,
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृज्यामहं ।।
पवित्राणाय साधूनांन विनाशाय च दुष्कृताम ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामी युगे युगे ।।
ही निसर्गाचीच कृपा आहे की माणसाची बुदधी ... हा प्रश्न वेगळा ... पण कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढण्याप्रत सदबुदधी निश्चितपणे माणसाला मिळत आलीय .
आता तुम्ही म्हणाल या गोष्टी वैज्ञानिक आहेत . पण सामाजिक संदर्भाबाबत, सामाजिक विषयांबाबत अभ्यास असायलाच हवा . त्यातील संशोधन मनासाठी उपयुक्त आहे खरे , कारण मन शांत असेल, त्यात सद्भाव असतील, तेव्हाच वाईटातूनही छान उभारून यायची प्रवृत्ती निर्माण होते .
संशोधन ... कुठलेही असो .... आवश्यकचं आहे ...
No comments:
Post a Comment