Take Diversion

'Take Diversion'


सध्या अशा प्रकारच्या पाट्या आपल्याला रस्त्यावर नजर पडेल तिकडे दिसत आहेत . मुळात रस्ता हा रस्ता  म्हणून राहिला नसून फक्त Diversions तितके तिथे दिसत आहेत . आमच्या यथाकथित 'सुंदर , सुव्यवस्थित या सुरक्षित ' शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लायओव्हरच्या कामामुळे जागोजागी असे Divert करणारे रस्ते अतिशय चांगल्या स्वरूपात बघायला मिळतील . त्यात तेथून प्रवास करतांना जणू काही 'Heaven on Earth' ची प्रचिती यावी . तो रस्त्यांचा नाजूकपणा ; ती धूळमिश्रित शुद्ध हवा , जिचा आस्वाद घ्यायला आजकाल सामान्य माणूस हपापतो , अप्रतिमच म्हणायचं .

या रस्त्यांचा आणखी एक अतिमहत्त्वाचा उपयोग म्हणजे आमचे Physiotherapy चे पैसेही वाचतात . थंडीच्या दिवसात हात - पाय दुखणाऱ्या , वाताचे वरदान लाभलेल्या 'रंजल्या - गांजल्या ' लोकांचे अतिउत्कृष्ट प्रकारचे व्यायामप्रकार मोफत होतात . दर्जेदार असे 'Acupressure ' मिळते .

शिवाय आमच्याकडील काही भागांतील प्रथा तर तुम्हांला माहीतच नाही . ऑटोत ६ ते ७ जण जमल्याशिवाय आम्हांला रस्ता दिसत नसतो . फक्त चार लोकांना बसवून स्वारी करणे , छे ... इतकं तुच्छ , निकामी समजता की  काय तुम्ही ? आमच्या Reputation च काय ?  अखेर आमची महान परंपरा हो ती ! तर अशा ६ -७ 'जीव मुठीत घेऊन ' बसलेल्या लोकांच्या मैत्रीपूर्ण सान्निध्यातून आमचा प्रवास होतो . कुणाचा हात तिरपा होतो , कुणाचा तर पाय ओढल्या जातो . पण आम्ही खरं म्हणजे मुळातच सहनशील माणसं . याबाबतीत खरतरं दैवी कृपाच आहे आमच्यावर म्हणायची .

मांडीवर बसवून घेण्याची प्रथाही आमचीच बरं . Adjustment म्हणून आम्ही हे प्रयोग रोजच करतो . कारण लवकर निघण्यापेक्षा आनंद तो कोणता असतो ? केव्हा केव्हा तर Overloaded Truck एखाद्या पडक्या पुलावरून जातोय , तेव्हा त्याची जर तो पूल एक मनुष्य असता तर काय अवस्था असती , असे विचार गुटगुटीत बालक मांडीवर बसल्यावर येतो , साहजिक आहे . त्यात रस्त्यावर जे गोल , गोंडस असे छान खड्डे आहेत , ते तर अगदी चंद्रावरील डागांसारखे दिसतात . अविभाज्य घटक आहे तो आमच्या रस्त्यांतला . मुळात रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ते हे महाभयंकर Sphinx चं कोडं आम्हांला काही सोडविता येत नाही बुवा ... असो ... शेवटी आपले मन Divert करून प्रवास करणे याशिवाय या Diversions नी काही पर्याय तरी सोडला आहे का ?

No comments:

Post a Comment

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...