Superwoman ...
शहाणपण देगा देवा ...
महिमा वयाचा ...
महिमा वयाचा ...
जगात वेगवेगळ्या प्रकारांत फरक केले जातात. मुळात वयामुळे फरक करणे कधीकधी चुकीचेच ठरते. कारण बऱ्याचदा वाढतं वय समजदारी वाढवतंच असं नाही आणि कमी वय अल्लडपणा दाखवेलच असं नाही.
मोठ्यांचे जसे आपण आशिर्वाद घेतो तसेच लहानांच्या प्रेमाचीही तितकीच आवश्यकता असते. नाहीतर आपण एकीकडे आशीर्वाद घेत राहत, दुसरीकडे लहानग्यांना त्रास देऊन तेच आशिर्वाद संपवत असतो. मग आयुष्याची 'बॅलन्स शीट' वाढेल कशी ? ती तर रिकामीच राहणार !
ज्याप्रमाणे थोरले 'आशिर्वाद' देऊन आपल्या पुण्याईच्या 'बॅलन्स शीट' मध्ये 'क्रेडिट' वाढवत ठेवतात, त्याचप्रमाणे धाकटे 'दुआँ' देऊन त्यात 'बरकत' करत असतात. त्यांचे प्रेम, आपुलकीची सर या मजा काही औरच ...
बरे असेही नाही कि थोरले बऱ्याचदा शहाणे असतील. किंबहुना याबाबतीत धाकट्यांना मानावे लागेल. 'हुकूम मेरे आका' म्हणत सगळ्या जबाबदाऱ्या तेही लिलया पार पाडत असतात. एक विचार करा, जर त्यांनीच जबाबदारीचे पालन केले नाही तर ? धाकटेपणाचा विट त्यांनाही येत असेल हो ! असो, वयाच्या बाबतीतही एकप्रकारे विचार परिवर्तन होणे आवश्यकचं आहे कारण बऱ्याच जणांना यामुळे मोठेच होता येत नाही.
अजिंठा . . .
अजिंठा . . . अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...
-
आठवणी ... आठवणी... परीसस्पर्श जणू , आठवणी... शिशिरातील इंद्रधनू , आठवणी... पावसाळयातील चकोर , आठवणी... आश्विन...
-
Some moments remain evergreen in our life ... Having always a magical touch ... It's obvious that these are not to stay with us forever...
-
'Take Diversion' सध्या अशा प्रकारच्या पाट्या आपल्याला रस्त्यावर नजर पडेल तिकडे दिसत आहेत . मुळात रस्ता हा रस्ता म्हणून राहिला न...