Showing posts with label एक काळरात्र ठरलेली सकाळ. Show all posts
Showing posts with label एक काळरात्र ठरलेली सकाळ. Show all posts

एक काळरात्र ठरलेली सकाळ

एक काळरात्र ठरलेली सकाळ

कोण म्हणतं की हरण्यात पुरुषार्थ नाही ? 'पानिपत ' अशा पराभवाची कहाणी आहे , ज्यात स्वयंभूना , मर्दांना जिंकण्याचीही गरज नसते हे दिसून येते . 'हारकर भी बाजी जितनेवाले को बाजीगर कहते है ।' हे विधान विनासायास नव्हे . जर विजय होऊनही अब्दाली आमच्या मायकडे परत बघण्याची दृष्टीही आणू शकला नाही , तर यापेक्षा वेगळा 'विजय ' तो कोणता ? जर आजही उत्तर भागात अब्दाली , नजीब यांच्या कथांऐवजी सदाशिव भाऊंवरील पोवाडे गायले जातात , तर यापेक्षा 'विजय ' तो काय असतो ? अख्ख हिंदुस्थान हातात घेण्यासाठी आलेल्या घुसखोरांच्या मक्तेदारीऐवजी 'भाऊपूर' हे गाव वसतं  , यापेक्षा मोठा 'विजय ' तो कोणता ?

कटकारस्थानं करणाऱ्या विरोधी माणसांच्या त्या वणव्यात , जिथे साक्षात प्रकृती आपल्या विरोधी होती , तेथे लाचार आपण काय करणार होतो ? दक्षिणायनानंतर सूर्याच्या स्थितीतील स्थित्यंतरे ; पालापाचोळाही ज्यांच्या नशिबी नव्हता ती जनावरे आणि सर्वांत भाग्यवान म्हणजे आमची पाण्यावर जगणारी , उपाशी असणारी फौज त्यात मांसाहारही रास नसणाऱ्या आमच्या माणसांना सहन करावी लागणारी मृतदेहांची दुर्गंधी ; त्यातून शरीर काय मनही क्षीण करणारे रोग ; गारठवणाऱ्या थंडीत त्यासाठी पूर्णपणे सज्ज असणाऱ्या फौजेविरोधी , तिची थोडीही सवय नसणारे , अपूर्ण वस्त्रातले आपले सैन्य काय कल्पना होती की , निसर्गही बेईमान होईल .

आपलं घर , बायका पोरं यांची चिंता डोक्यात घेऊन रणांगणावर अर्धे सैन्य आडवं पडल्यावर जी मनाची घालमेल होत असेल , विचार तरी करवतो का ? १४ जानेवारी १७६१ चा तो 'संक्रांतीचा ' दिवस महाराष्ट्रातील सर्व घरांवर काळ्या छायेसारखा अशुभ ठरला . काय करायला हवे होते , नको होते , याचा विमर्श करण्यात आता अर्थ नाही . पण हे बलिदान अर्थशून्य नव्हतेच . अर्धी सेनाही नसतांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे धाडस फक्त मराठी माणूस करू शकतो , हे जगमान्य झाले ते या लढाईने .
'कोण म्हणतं पानिपत काही देऊन गेलं नाही ,
हारुनही दिमाखात आठवल्या जाण्याचं भाग्य पानिपतात आहे !'

कधीकधी हरणं माणसाला जिंकण्यापेक्षा महत्वपूर्ण ठरतं , कारण त्यातून जो अनुभव मिळतो , तो मौल्यवान असतो .
'रणांगणावर जरी आपलं पानिपत झालं ,
बाहेरचा रस्ता दाखविण्याचं कसब आपल्या सगळ्यांत आहे .'

आपल्याच मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान देण्याची तयारी असणाऱ्या शूरवीरांनाच वीरगती प्राप्त व्हावी , याला सुदैव कि दुर्दैव  हेच कळत नाही . असो ... पानिपतची ती भूमी पावन झाली ती आपल्या शूरवीरांच्या कर्तृत्ववान रक्ताने , या लढाईनेच आपल्याला विपरीत अशा परिस्थितीतही हार न मानायला शिकविले .

एखाद्या जिंकलेल्या लढाईपेक्षाही एखादी हरलेली लढाई माणसाला कशी जिंकायला शिकवितो किंबहुना प्रवृत्त करते , यापेक्षा विलक्षण व अदभूत तरी काय असतं ? अख्ख्या इतिहासात अशी काळरात्र ठरलेली 'सकाळ' नसेल, तरी तिच्या वीरगाथा गेल्या जाव्यात , हे स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे .

नशीब हे काय असत किंवा काही गोष्टी कशा आपल्या हातात नसतात याचा उत्तम दाखला 'पानिपतने ' जणू दिला. सगळ्या बाबी जरी विपरीत होत्या किंबहुना झाल्यात तरीही  आजही तेथील सन्मानार्थ उभी ठाकलेली शिळा आपल्या उत्तुंग यशाची साद देते ,
'वीरमरण व्यर्थ जाण्यासाठी नसतं ,
ते कधीही असामान्य असतं ! '
पानिपतची आठवण व ती संक्रांत आपल्याला हे शिकवून जाते .

पानिपतमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या हार एक स्वातंत्र्याच्या शिलेदाराला मनाचा मुजरा ... 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...