आठवणी ...
आठवणी...
परीसस्पर्श जणू ,
आठवणी...
शिशिरातील इंद्रधनू ,
आठवणी...
पावसाळयातील चकोर ,
आठवणी...
आश्विनातील चंद्रकोर ,
आठवणी...
स्नेहांचं पंचपक्वान्न ,
आठवणी...
करी आयुष्य भावपूर्ण संपन्न ,
आठवणी...
मंदिरावरील शोभिवंत कळस ,
आठवणी...
अंगणातील पवित्र तुळस ,
आठवणी...
भावनांचा अविस्मरणीय मेळ ,
आठवणी...
विचारांचा गुंतागुंत खेळ ,
आठवणी...
नाविन्याची आस ,
आठवणी...
परत परत होणारे सुंदर भास ,
आठवणी...
रात्रीस पडलेले सुरेख स्वप्न ,
आठवणी...
माणसाला करते मंत्रमुग्ध मग्न ,
आठवणी...
कधी डोळ्यांत आणते पाणी ,
आठवणी...
का अपूर्ण असते प्रत्येक कहाणी ?
No comments:
Post a Comment