माणसाची गोष्ट ...
एका विचित्र , भयाण भविष्याच्या कल्पनेकडे नेण्याचं काम कोरोनान केलंय . ज्याला त्याला आपल्या पिंजऱ्यात कैद करण्याची ताकद ठेवणारा मनुष्य आज हतबल झालेला, होतांना दिसला , कदाचित पहिल्यांदाच आणि हे दुर्दैवी वास्तव निसर्गनिर्मित आहे का मनुष्याची करणी ते तर विधात्यालाचं ठाऊक . तरी धोका कारणामागे लपेल कसा ?निसर्गनिर्मित असल्यास भविष्यात माणसाने निसर्गाला गृहीत धरू नये असा सल्ला जणू माणसाला मिळालाय . मात्र मानवनिर्मित असेल तर स्थिती त्याहून वाईट , कारण मनुष्य निसर्गाइतका समजूतदार नाही , असता तर कदाचित आज हे अघटित घडलंच नसतं .
एक गोष्ट निश्चितपणे यातून शिकायला मिळते , ती म्हणजे जरा जास्तचं शिकलेल्या , अतिशहाण्या या माणसाला अजूनही शहाणपणाची गरज आहे तीही निसर्गराजाकडून . स्वतःच्या शहाणपणात इतका काय भारावून गेला कुणास ठाऊक , ज्याला स्वतःच्या अस्थित्व व अंताचा ठावं नाही तो अमर्याद , अथांग सृष्टीच्या नियमावलीत ढवळाढवळ करायला निघाला . आपल्यात असं वागण्याची सवय आहेच माणसाला , पण तो आता मर्यादा ओलांडतोय .
निसर्ग जितका सोज्वळ , समजूतदार आहे , वेळ आल्यावर शंकराप्रमाणे तांडवही करू शकतो याची प्रचिती जणू मिळतेय . अजूनही वेळ गेली नाहीये . माणसानं त्याच्या दिलेल्या हद्दीत रहावं यातच त्याची भलाई आहे . 'खतरो के खिलाडी ' दूरदर्शन संचावरचं शोभतं , खऱ्या जीवनात मनुष्य प्रकृतीला टक्कर देऊच शकत नाही . तसा गोडं भ्रम करणे माणसाचा धादांत मूर्खपणा आहे .
No comments:
Post a Comment