साहित्य

साहित्य 

'साहित्य ' हे अजाण सौंदर्य आहे . त्याला तोलून मोलून चाळत यायचे नाही . किंबहुना ते  गणितासारखे ठराविक उत्तर काढणारे शास्त्र तर नाहीच नाही , त्याची स्वतःची अशी एक आगळीवेगळी ओळख आहे . त्यात जर ठराविकपणा आला , तर ते साहित्य कसे ?

साहित्याचा उद्देश्य मानवाच्या उद्धारासाठी आहे . जगत तर मनुष्य आधीही होताच , पण साहित्याने त्याला एका प्राण्यापासून 'माणसाचा ' दर्जा दिला . त्याला मानवी मूल्य देऊन सुसंस्कृत बनविले . आणि आज त्याच साहित्याला बंदिस्त कक्षेत बघताना काळजी वाटते . कदाचित यामुळेच उच्चविद्याविभूषित असूनही ते हळवे , नाजूक कविमन हरपतंय . महत्वाचं म्हणजे Logical and Rational Thinking कडे कल वळल्यामुळे मुळात साहित्यात त्याचे मूळ गुणधर्म व वैशिष्ट्ये उरलीत कुठं ?

प्रत्येक गोष्ट मनुष्य स्वतःच्या मुठीत नाही घेऊ शकत . 'साहित्य ' हे त्यांपैकीच एक ...


1 comment:

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...