निसर्गाची गुगली ...
आजकाल निसर्गाच्या मनात काय असतं, ते स्वतः निसर्गालाही माहित नाही. आज किती गारवा असेल आणि उद्या त्याचं रूपांतरण उकाड्यात कोणत्या गतीने होईल, याचा विचार कदाचित निसर्गालाही करता येत नाही. सध्या एखाद्या मातब्बर गोलंदाजाने 'गुगली' टाकून विषयचं संपवावा, तशाच प्रकारे जणू निसर्ग सगळ्यांना बाद करण्याच्या मार्गावर आहे.
अगदी मागील आठवड्यात सगळीकडेच थंडीची लाट होती. मागच्या दोन दिवसांपासून ती ओसरून अचानक खूपच उबदार ऊन जाणवले. लगेच कालपासून अचानक 'गुगली' टाकून माणसाची 'विकेट' पाडणारी थंडी पडलीय. अशा वातावरणामुळे थेट सगळ्या घरांत एक तरी व्यक्ती आजारपणामुळे 'आउट' होत आहे.
पण या प्रकाराला मनुष्य स्वतःच जबाबदार आहे, कान धरुनही जर त्याला सुधारायचेच नसेल तर निसर्गालाही दोष देवून काय उपयोग? तरी त्याने माणसाला खूपच समजून घेतले आहे. बऱ्याच संधी दिल्या आहेत पण मनुष्य काही समजावून सांगण्याच्या योग्य नाही, हे त्यानेचं त्याच्या कृत्यावरून बऱ्याचदा दर्शवून दिले आहे. म्हणूनच आता निसर्गानेही त्याचे रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आहे. असेच सुरु राहिल्यास निसर्गपुत्र म्हणवल्या गेलेला मनुष्य स्वहस्ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन होण्याचे काम करून होईल. किंबहुना तशीच सुरुवात झालेली आहेच!
मनुष्य कधीच निसर्गाच्या शक्तीला नाकारु शकत नाही. त्याने तसे समजणे, त्याचाच अंत घडवेल. असो ...
शेवटी मनुष्याच्याच हातात आहे का आनंदाने जगावे का कन्हतं मरावे...
No comments:
Post a Comment