इंग्रजी उवाच ...
परकीय संस्कृतीची कमालीची पकड आजही समाजावर प्रकर्षाने दिसून येते. आपण जरी स्वतंत्र झालो, तरी आपली मने अजूनही किती 'colonized' आहेत, ते नेहमीच काही विद्वान इंग्रजीच्या वापराचा (जरी व्यवस्थितरीत्या येत नसले तरी) अट्टहास करतांना दिसतात.
तसे याचे दाखले पूर्वीपासूनच दिसून येतात. पण इंग्रजीला जबरदस्ती प्रयोग करण्याची, तिची आई - बहीण, बाबा - दादा एक करण्याची जी अद्भूत शक्ती या धाडस हे लोक करतात, त्यावर हसावे कि रडावे हा प्रश्न निर्माण होतो.
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचीच मी गोष्ट सांगते. त्या व्यक्तीला उगाचंच 'fluently' या शब्दाचा वापर करण्याची सवय आहे, तेही अगदी 'fluently'! (त्याच व्यक्तीची शैली) तशी तुमच्या - आमच्यासारख्या सध्या माणसांसाठी या शब्दाच्या वापराच्या काही मर्यादा आहेत. पण या विद्वान व्यक्तीने 'fluently' ची व्याख्याचं बदलली आहे. एखादी गोष्ट सामान्य व्यक्ती 'easily' घेतो, पण हि व्यक्ती त्यासाठी 'fluently' चाच बळी देते. एखादी गोष्ट व्यक्ती 'effectively' करू शकतो. पण नाही, आमच्या 'fluently' ची सर कशालाच नाही.
गरज नसतांना किंवा चुकीच्या ठिकाणी उगीचच 'adverb' वापरून आपली हुशारी दाखविण्याच्या नादात बऱ्याच व्यक्तींकडून जास्तीचे ज्ञान प्रदर्शन होते, हा प्रकार त्यातलाच एक !
No comments:
Post a Comment