प्रवास ...
प्रवास ,
कधीही न थकणारा , अविरत , अखंड , अटळ , अलिखित , अद्वितीय , अनुभवसंपन्न , अभिलाषी , अविनाशी , अलौकिक ...
ज्याचा त्याचा , ज्याच्या त्याच्यासाठी ...
लगेच मोक्ष मिळेल असा कुठं असतो प्रवास ?
कधीही न सुटणाऱ्या स्फिन्क्सच्या कोड्यासारखा असतो जीवनाचा प्रवास ...
दिवस - रात्र , ऋतुमान यांसारखा ठराविक ही कुठं असतो प्रवास ,
अनपेक्षितांची अखंड साखळी घेऊन येतो तो जीवनाचा खरा प्रवास...
गणित , रसायनशास्र यांसारखी निश्चितता त्याच्यात नाही ,
कधीही उफाळून येणाऱ्या लाटेसारखा आहे हा जीवनाचा प्रवास...
हा काही तास , दिनांचा नाही ; तर जन्मभराचा आहे ,
आणि तुम्ही आम्ही जिवंत प्राणी खरे प्रवासी आहोत ...
जीवनाच्या प्रवासाला तुम्हांला कुठं जावं लागतं नाही ,
तुमचा कण - कण , क्षण - क्षण तो प्रवास अविरतपणे करत आलाय , करतोय ...
इथे कुणाचा सहवास लाभो न लाभो , प्रवास अटळ आहे ,
इथे कुणाची साथ भेटो न भेटो , प्रवास अविरत आहे ...
जन्म व मृत्यू या दोन ध्रुवांमधलं जग आहे प्रवास ,
सत्य आणि असत्य यातील दुवा आहे प्रवास ...
असा हा प्रवास दिवसागणिक वाढतो ,
तीळ - तीळाने , कणा - कणाने आणि माणसाला अनुभवसंपन्न बनवितो ...
खरं म्हणजे जीवनाची आस आहे प्रवास ,
साध्यापेक्षा खास आहे प्रवास !
जन्म व मृत्यू या दोन ध्रुवांमधलं जग आहे प्रवास ,
No comments:
Post a Comment