समजदारी

समजदारी

समजदारी , मुळात ही असते कुणाची तरी मक्तेदारी ,
लोकांप्रमाणे चाललो तर आपण समंजस ,
' हुकूम मेरे आका ' म्हटलं तर आपण समंजस ... 

बर समंजस आपणच असावं ,
लोकांच्या अपेक्षांसाठीही आपणच झुरावं ... 

आपण कितीही समजून घेतलं तरी हे लोक समजून घेत नाही ,
एकदाही जर ऐकलं नाही तर ' नासमज ' हा ठपका कधी ठेऊ म्हणून त्यांना झोप लागत नाही ... 

माणूस अपेक्षा करतो दुसऱ्याच्या समंजसपणाच्या अतोनात काहीबाही ,
मग काय हा नासमजपणा नाही ?

कुणी समंजसपणाचा ठेका घेत नसतो ,
परत परत माणूस जास्त सहन करत नसतो ,

तरी का येते मग वागण्यात मक्तेदारी ,
आणि मग आपलीच गृहीत धरल्या जाते समजदारी ... 

इतकं समजून झालंय की समजून घेण्याची भीती वाटते ,
या खोट्या नांवाखाली कुणाचा गुलाम होण्याची भीती वाटते ...

या ' समजदारीलाच ' बनवलंय माणसाने हत्यार ,
आणि मग भक्ष्य बनतो असाच एक ' समजदार ' ,

असो ,
नेहमीच या जगात समजदार बनून चालत नाही ,
हे कलियुग आहे ,
येथे वाल्याचा वाल्मिकी होत नाही !

No comments:

Post a Comment

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...