जीवन...

जीवन... 

जीवन ,

जणू एक भयाण रखरखतं वाळवंट ,

कधीही न संपणारा उदास उन्हाळा ,

अनिश्चित काळासाठीचा वनवास ,

सुनिश्चितआहे तो फक्त वेताळासारखा मानगुटीवर बसलेला हा प्रवास ,

परत न घेता येणारा शाप ,

आपल्याच हातून आपला विपर्यास ,

मृगजळाच्या शोधात माणूस झालेला भकास ,

सद्सदविवेकबुद्धी , शांती जणू होते लंपास ,

निश्चित दिशा कधीही न दाखविणारा कंपास ,

बस ग्रे छटांचा हा भलामोठा कॅन्व्हास ,

लोकांची गर्दी ही महान ,

आपलाच मेंदू राहतो गहाण ,

एक तडफडत ठेवणारा विषाचा प्याला ,

बांधील आहे आत्मा शरीराला ,

आपणच घोटतो स्वतःचा गळा ,

संताप , उद्विग्नता आपणच गिळा ,

कित्येक विविधरंगी सुंदर स्वप्न ,

प्रत्यक्षात मन झालयं फक्त भग्न ,

डोळ्यांत आणते कित्येकदा पाणी ,

कुठे खरी असते स्वप्नातील कहाणी ...  

No comments:

Post a Comment

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...