वर्तमान समाजाची विषण्ण दशा !

वर्तमान समाजाची विषण्ण दशा !


काय झाले आहे आजच्या युगाला ,
अनेक समस्यांचा विळखा बसलाय या देशाला !

परिस्थिती बघता आजची , डोळ्यांत येते पाणी ,
उघडपणे होत आहे समाजाची हानी !

जन्माला येण्याआधी छाटल्या जातात कळ्या ,
पण नाही बसत अशा हातात हथकड्या !

जिथे तिथे बघायला मिळतो स्वैर भ्रष्टाचार ,
आणि आम्ही देतो अशा पापांना आधार !

दंगे , बॉम्बस्फोट , कत्तली यात समाज बरबटलेला आहे
मनुष्य पशुपेक्षा  वाईट बनत चाललेला आहे !

येथे देश करतो आहे नवतरुणांकडून आशा ,
व्यसनाधीन तरुणाई करते आहे फक्त निराशा !

लोकसंख्येचा भस्मासूर जातो आहे वाढत ,
गरिबांची होते आहे दिवसेंदिवस वाईट हालत !

नवी पिढी किती मदमस्त होते आहे आज ,
आईबापाला सांभाळण्याची वाटत आहे लाज !

अशा नव्या चंदेरी दुनियेत जगत आहे मनुष्य ,
आपल्या जुन्या संस्कारांना करतो आहे अदृश्य !

एकविसाव्या शतकाच्या नव्या पर्वात जगतोय आम्ही ,
स्वतःच्याच तोंडाला काळीमा फासतोय आम्ही !

कशी मिळेल अशाने जगण्याची दिशा ,
समाजाची होते आहे विषण्ण दशा !

No comments:

Post a Comment

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...