दि. २८ फेब्रुवारी ला 'जागतिक विज्ञान दिवस' मोठया उत्साहाने साजरा झाला. विज्ञान चराचरांत आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांचं आहे. पण कालचा किस्सा अजूनही मला विचार भाग पाडतो आहे, कि ते सगळ्यांचं आहे का ? ते काही लोकांना मान्य आहे का ? किंबहुना काही व्यक्तींनी अगदीच कठोरतेने त्याला एका विशिष्ट स्थान देण्याच्या नादात बाकीच्यांपासून वेगळं केलयं, हे योग्य आहे का ? मी कला व मानवविद्या शाखेची सेवेकरी आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणी विज्ञान शाखेच्या आहेत. अगदी विमाशाखा असणारी माझी एक घनिष्ठ मैत्रीण आहे, आजकाल ज्यासाठी 'Bestie' हा शब्दप्रयोग केला जातो. आमच्यावरून तसे 'कला आणि विज्ञान एकमेकांना कसे पूरक आहे' हे दिसतचं.
पण तरीही विचार करण्यासारखा एक उपस्थित झाला होता, आणि विज्ञान दिवशी ... सकाळीच एका हौशी शेजारणीने मला 'Happy Science Day' अश्या शुभेच्छा दिल्या, तिचा 'Day' आटोपत नाही, तसेच 'अरे बाप रे, तुम्ही तर आर्टस् चे असल्यामुळे आर्टस् डे साजरा करत असाल ', असे म्हणत जणू काही महान चूक केली आहे किंवा आम्हाला 'Science Day' चा 'S' कळतं नाही, असे समजून वरील उच्चारण केले असावे. असो ... 'जैसी जिसकी सोच' ... मी तिला म्हटले का आजचा दिवस सगळ्यांना आहे, किंबहुना असावा. कुठल्याही दिवसावर कुण्या एका विशिष्ट समूहाचा अधिकार नाही, किंबहुना असायला नको. खरी गंमत तर आता पुढे घडते. मी सहजच तिला विचारले, का गं ? नेमके काय झाले होते आज की याला विशिष्ट नोंद आजच मिळाली? तेव्हा खरी तिची बोबडी वळली. आणि मग मोबाईल शोधत गुगल बाबांचा सहारा घेण्यासाठी ती आत धावली. आता मला प्रश्न पडला की, खरचं हि विज्ञान शाखेची संशोधक विद्यार्थिनी आहे का ? असो ... गोष्ट छोटीशी आहे. पण विचार करायला लावणारी ही तितकीच ... व्यक्ती इतका कसा पक्षपातपूर्ण असू शकतो, का कुठल्याही थराच्या व्यापक तितक्याच भंपक कल्पना गृहीत धरून मोकळा होतो.
आपल्या प्रवाहाचा/ शाखेचा अभिमान असणे रास्त आहे. पण म्हणून दुसऱ्यांच्या लायकीवर प्रश्न करणे किंबहुना त्यांना न समजता काहीतरी निर्णय घेणे, हा कुठला न्याय आहे ? तसही म्हणतात, ' Don't judge a book by its cover.'
मुळात एखादी व्यक्ती सगळ्यांचं गोष्टी करू शकत नाही. त्याला एका ठिकाणी एखादा रस्ता सोडावाच लागतो. त्याला कारणे अनेक असू शकतात. फक्त लायकी नाही. म्हणून जर आपण त्याच्याकडे बघत असू तर आपल्याला आपला चष्मा बदलायची गरज आहे.
शिवाय कुठलेही शास्त्र कमी नाही, त्यामुळे कुणालाही उगाच हिणवण्यात काहीच मजा नाही. प्रत्येक ज्ञानशाखेचे स्वतःचे एक महत्त्व आहे. आणि हो परस्परपूरक असे हे गणित आहे. 'एका हाताने टाळी वाजत नाही'. तसंच एकाच गोष्टीने हे जग चालत नाही.
आजच्या जगात जो तो स्वतःचे प्रभुत्व गाजवतोय ... गाजवावे ... मान्य आहे. परंतु म्हणून दुसऱ्या अंगाला पंगू समजणे चुकीचे आहे. प्रत्येक अंगाचे स्वतःचे असे एक महत्व आहे, जे असाधारण, विलक्षण, अद्वितीय आहे. त्यामुळे ते मान्य करणे, त्याला त्याचे महत्व बहाल करणे, हे महत्वपूर्ण ठरते. सप्तरंगी इंद्रधनुष्यातील रंग आपण अगदीच विलग नाही करू शकत. आणि प्रत्येक रंगाला स्वतःचे वैशिष्ट्य आहे. तो त्याच्या पद्धतीने श्रेष्ठ आहे. हे तसेच आहे, हे जितक्या लवकर सगळ्यांना कळेल, तितके चांगले ठरेल. बाकी आपण लोकांच्या विचारकक्षा समजून सोडून द्यावे. कसंय,
'घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी पिणे न पिणे, त्याचे त्याने ठरवावे.
असो,
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ...
No comments:
Post a Comment