भाऊ- बहिणीचे प्रेम ...

जगातील सर्वांत सुंदर, अतूट, निर्मळ, निःस्वार्थ प्रेम म्हणजे भाऊ- बहिणीचे प्रेम ... 
एक तरी भाऊ असावा किंवा एक तरी बहीण असावी ते उगाच नाही म्हणतं ... 

तर भाऊ कोण असावा ?
सर्वांत जास्त स्त्रिला ज्या व्यक्तीसोबत असतांना सुरक्षित वाटते, तो असतो भाऊ ... 
दाखवत नसेल कदाचित पण तरी तो  जीवापाड काळजी घेतो, तो असतो भाऊ ... 
स्त्री जातीला होणारे कष्ट जो जाणतो तो असतो भाऊ ... 
गरज पडल्यावर आपल्या बहिणीसाठी जगाशी भांडतो तो असतो भाऊ ... 
लहान असेल तरी बहिणीवर अपार प्रेम करणारा, तिच्याकडून लाडाने हट्ट पुरवून तिच्यातील ममत्त्व कायम ठेवणारा तो असतो भाऊ ... 
बहिणीचे माहेर शेवटपर्यंत जपतो तो असतो भाऊ ... 
बहिणीसाठी गरज पडल्यास बाप बनतो तो असतो भाऊ ... 
भाऊ बहिणीला मिळालेलं सर्वांत सुंदर वरदान आहे ... 
फक्त सहोदर नसून एक मित्र, पिता, मार्गदर्शक, सहकारी इत्यादी भूमिका पार पाडतो, तो असतो भाऊ ... 

आणि बहीण कोण असते ? 
भावात जिचा जीव बसतो ती असते बहीण ...
आईनंतर तेवढीच माया लावते, ती असते बहीण ... 
भावाच्या चुकीला अनेकदा झाकते, ती असते बहीण ... 
भाऊ जिच्याकडे विचार न करता मोकळा होऊ शकतो, ती असते बहीण ... 
उदास भावाला "ताटी उघडा" म्हणून धीर देणारी, ती असते बहीण ... 
ती फक्त बहीण नसून एक मैत्रीण मैत्रीण, आई, मार्गदर्शिका, सहकारी इत्यादी भूमिका पार पाडते, ती असते बहीण ... 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...