अजिंठा . . .

 अजिंठा . . . 


अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त, डोळ्यांचे पारणे फेडणारे तितकेच त्याचे सौंदर्य, तितकाच अल्लड, तितकाच निरागस, तितकाच व्याकुळ, तितकाच खंबीर, तितकाच असहाय्य, अगदी पारोसारखा ... 
पारो- रॉबर्टची प्रेमकहाणी कधीतरी पाठ्यक्रमात होती. वाचतांनाच आपलीशी जी आपली वाटली तितकाच आपलासा 'अजिंठा' चित्रपट पडद्यावरही आपलासा वाटला. कित्येक दिवस, ऋतू, वर्ष आले अन गेले पण अजिंठ्याचे तारुण्य अबाधित होते किंबहुना राहील. 
विज्ञान म्हणतं, दगडांत जीव नसतो, निर्जीव वस्तू बोलू शकत नाही, त्यांना भावना नसतात. पण अजूनही जर अजिंठ्याला गेलात तर विश्वास करा, अजिंठ्याचं धडधडणारं हृदय तुम्हाला शहारे देऊन जाईल. रसिकाच्या चष्म्यातून  बघितले तर जाणवेल की कृष्ण- धवल जरी भासले तरी अजिंठ्याचे अंत:करण बहुरंगी आहे. कठोर जरी लाभले तरी अजिंठ्याचे हृदय मवाळ आहे. विश्वकर्मानिर्मित या विश्वाच्या सर्वांत सुंदर मानवनिर्मित कलाकृतीचा तो उत्तम नमूना आहे. अजिंठा एक सुंदर कविता आहे, जिचे बोल युगानुयुगे माणसाला खुणावतील. चलबिचल मनाला कमालीचं स्थैर्य देण्याचं काम तिथली शांतता करते. अजिंठ्यात एक नादमाधुर्य आहे. एक शाश्वत, चिरंतन, प्रकाशाला साद देणारा आवाज आहे. 'भिंतीलाही कान असतात', हो, अर्थातच, पण येते भिंतींना 'वाचाही' आहे. या भिंती साधारण नाहीत. माणसाला बदलून टाकण्याचे धाडस त्यांच्यात आहे. या कलाकृती साद देतात, एक काळाची, जो चिरतरुण आहे.
अजिंठा अजरामर आहे, पारो- रॉबर्टच्या प्रेमासारखं अगदी सुंदर, कोमल पण तितकचं काटेरी, वणव्यात भस्म झालेलं, तितकचं अमर्याद पण विषाच्या परीक्षेत फसलेलं. ते तितकचं अबोल पण बोलकं, ते तितकचं पवित्र पण जगाने नाकारलेल. 
प्रेम गोष्टचं अशी आहे, ज्याचा नाद माणसाला सहजासहजी जगू देत नाही, तो पेटता निखारा आहे, नवचैतन्याने भरलेले तरुण गिळंकृत करण्याची त्यात ताकद आहे. प्रेम तितकचं स्वागतार्ह आहे पण तितकच पोरकं. अजिंठ्याचा वारसा त्याचा जिवंत साक्षीदार आहे. आणि काही गोष्टी शब्दांत व्यक्त कुठे होतात! शब्द आपले बापुडे प्रयत्न करतात. पण अशाही गोष्टी आहेत, ज्या फक्त शब्दांच्या आवाक्यात नाही घेता येत. जिथं शब्द थकतात, हरतात तिथे हा वारसा काम करतो, अजिंठ्याचे तसेच आहे. सगळं काही प्रत्यक्ष दर्शनी आणून देण्याचं काम अजिंठा करते. अजिंठा एक वास्तव आहे, तितकीच कल्पना. अजिंठा एक शिल्प आहे, तितकीच प्रेरणा. अजिंठा नववधू आहे, तितकीच लंकेची पार्वती. अजिंठा एक खुले पुस्तक आहे, तितकचं  एक कोड. 
अजिंठा . . .   अजिंठा . . . 
अजिंठा एक रहस्य आहे, जे कित्येक पैलू स्वतःमध्ये सांभाळत दिमाखात उभे आहे. 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ... 

अखिल जगाचे गुरुदेव, ज्यांच्या अतिसुंदर तसेच संवेदनशील 'गीतांजलीने' संपूर्ण जगाला भुरळ पाडली, १९१२  चा 'साहित्यातील नोबेल'  भारताला मिळवून देण्याचा बहुमान ज्यांनी दिला, अशा रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१  रोजी कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला. देवेंद्रनाथ आणि  शारदादेवी यांचे ते तेरावे अपत्य होते. 

रवींद्रनाथांनी त्यांच्या जीवनात अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य दाखवले. ते एक उत्कृष्ट कवी, कादंबरीकार, नाटककार तर होतेच सोबतच अव्वल दर्जाचे चित्रकार, संगीतकार आणि समाजसुधारक ही होते. रवींद्रनाथ ज्यांना 'बंगालचा बार्ड' ही म्हटले  जाते, त्यांचा बंगालच्या साहित्यावर एवढा प्रभाव होता की, बंगाली साहित्याची विभागणी 'रवींद्रपूर्व' व 'रवींद्रोत्तर' अशी केली जाते. 

रवींद्रनाथांच्या वैचारिक सृजनशक्तीची कल्पना आपल्याला यावरूनच येऊ शकते की, रवींद्रनाथांनी  वयाच्या अगदी आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी 'भानुसिंग' या टोपणनावाचा वापर करून अनेक कविता लिहिल्या. ते रवींद्रनाथच आहेत ज्यांनी भारताला 'जन गण मन' दिले तसेच बांग्लादेशला 'आमार शोनार बांग्ला' दिले. असे दोन देशांच्या राष्ट्रगीतांचे लेखन करणारे रवींद्रनाथ निश्चितच अद्वितीय ठरतात. 

शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक प्रयोग ठरलेल्या 'शांतीनिकेतनची' उभारणी ही टागोरांची दूरदृष्टी दर्शविते. त्यांनी श्री-निकेतन' नावाच्या एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना ही केली. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठीचे त्यांचे आवाहन त्यांची समाजाप्रती असणारी ओढ दर्शविते. 

रवींद्रनाथ कमालीचे राष्ट्रभक्त होते, हे त्यांच्या जीवनातील एका प्रसंगातून दिसून येते. ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९१५ साली 'सर' ही पदवी प्रदान केली होती. परंतू १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ही  पदवी सरकारला परत केली. 

रवींद्रनाथांच्या साहित्यात यमकप्रचुरता, आशावाद व गेयता प्रामुख्याने दिसून येतात. काव्यगटात 'गीतांजली' व्यतिरिक्त त्यांच्या 'मानसी', 'सोनार तोरी', 'बलाका' या उत्कृष्ट कलाकृतीही अविस्मरणीय ठरतात. त्यांनी 'चतुरंग', 'शेषेर कविता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', अशा चार लघुकादंबऱ्या व आठ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'वाल्मिकी प्रतिभा', 'चंडालिका', 'विसर्जन', 'चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ह्या त्यांच्या काही नाट्यकृती ठरतात. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य- नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह 'गलपगुच्छ' (कथागुच्छ) एक पर्वणीच आहे. 

रवींद्रनाथांच्या २२३० गीतांचा समावेश रवींद्रसंगीतात होतो. अभिजात भारतीय संगीताचा प्रभाव असलेले रवींद्रसंगीत नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्थान ठरले. रवींद्रनाथांनी सर्वप्रथम रचलेले गीत ' गगनेर खाले रविचंद्र दीपक ज्बले' हे तर शेवटचे गीत 'नूतन देखा दिक आरो बारो' हे ठरते. 

रवींद्रनाथांचा आणि महाराष्ट्राचा संबंधही तसाच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. रवींद्रनाथांवर संत तुकारामांच्या साहित्याचा असा काही प्रभाव पडला की त्यांनी संत तुकारामांचे काही अभंग बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. पु. ल. देशपांडे आणि द. रा. बेंद्रे या साहित्यकारांवर रवींद्रनाथांचा प्रभाव पडून आलेला दिसतो. 

रवींद्रनाथांची विचारशैली किती सकारात्मक व उर्जावान होती हे त्यांच्या प्रार्थना नावाच्या कवितेतून दिसू शकते. 

'बिपदे मोरे रक्षा करो ए 

नए मोर प्रार्थना 

बिपदे आमीना जेन 

करि भय ।।'

म्हणजेच,

'विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर 

ही माझी  प्रार्थना नाही तर 

विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये 

एवढीच माझी इच्छा आहे.'

अशा विविध कलाकृती देणाऱ्या रवींद्रनाथांचे शेवटचे दिवस कष्टदायक होते. कदाचित त्यामुळेच त्यांच्या शेवटच्या काही काव्यांत मृत्यूविषयक चिंतन आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. १९४० सालचा त्यांचा कोमा जीवघेणा ठरला आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी  कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा मृत्यू झाला. 'जोदी तोर डाक शूने केयू ना आशे तोबे एकला चलो रे' अशी एकला चलो रे ची साद देणाऱ्या रवींद्रनाथांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे शक्य नाही. 


मित्र ...

जिवनाची चौकट सोडून चौरस जगायला शिकवतात ते मित्र ... 

नया साल ...

यूं तो जो चीज आती है वह जाती है यह समझते हैं हम,

फिर भी कभी कभी किसी चीज को न गवाने की मन्नत करते हैं हम,                          

के यूं न जाना इस बार तू, आने वाले साल,

क्योंकि कुछ खास उम्मीद लिए बैठे हैं हम आज ...

वक्त ...

सब वक्त-वक्त की बात होती है ,

हर एक चीज का अपना वक्त होता है यहीं वक्त हमे सिखाता है। 

कुछ चीज़ें वक्त में गुम हो जाती है ,

पर सच मानो तो याद बहुत आती है। 

कुछ चीजें जो रह जाती हैं, नहीं मिलती कभी बाद में ,

और हम बस जगते रहते हैं उन चीजों की याद में। 

इसलिए वक्त के साथ चलना सीखो ,

हर बात उसी वक्त पर पूरी करना सीखो। 

Moments ...

 Some moments remain evergreen in our life ...

Having always a magical touch ...

It's obvious that these are not to stay with us forever ...

But there's something that remains though the moments are gone ...

These makes them immortal ...

Not less than a charm ...

Like a feather that gives you goosebumps ...

Like a weather that elevates your mood ...

Like a dream that you don't want o get interfered ...

Like a fragrance that you don't want to miss ...

These are the memories that help you to be alive ...

These are the memories that help you to survive ...

भाऊ- बहिणीचे प्रेम ...

जगातील सर्वांत सुंदर, अतूट, निर्मळ, निःस्वार्थ प्रेम म्हणजे भाऊ- बहिणीचे प्रेम ... 
एक तरी भाऊ असावा किंवा एक तरी बहीण असावी ते उगाच नाही म्हणतं ... 

तर भाऊ कोण असावा ?
सर्वांत जास्त स्त्रिला ज्या व्यक्तीसोबत असतांना सुरक्षित वाटते, तो असतो भाऊ ... 
दाखवत नसेल कदाचित पण तरी तो  जीवापाड काळजी घेतो, तो असतो भाऊ ... 
स्त्री जातीला होणारे कष्ट जो जाणतो तो असतो भाऊ ... 
गरज पडल्यावर आपल्या बहिणीसाठी जगाशी भांडतो तो असतो भाऊ ... 
लहान असेल तरी बहिणीवर अपार प्रेम करणारा, तिच्याकडून लाडाने हट्ट पुरवून तिच्यातील ममत्त्व कायम ठेवणारा तो असतो भाऊ ... 
बहिणीचे माहेर शेवटपर्यंत जपतो तो असतो भाऊ ... 
बहिणीसाठी गरज पडल्यास बाप बनतो तो असतो भाऊ ... 
भाऊ बहिणीला मिळालेलं सर्वांत सुंदर वरदान आहे ... 
फक्त सहोदर नसून एक मित्र, पिता, मार्गदर्शक, सहकारी इत्यादी भूमिका पार पाडतो, तो असतो भाऊ ... 

आणि बहीण कोण असते ? 
भावात जिचा जीव बसतो ती असते बहीण ...
आईनंतर तेवढीच माया लावते, ती असते बहीण ... 
भावाच्या चुकीला अनेकदा झाकते, ती असते बहीण ... 
भाऊ जिच्याकडे विचार न करता मोकळा होऊ शकतो, ती असते बहीण ... 
उदास भावाला "ताटी उघडा" म्हणून धीर देणारी, ती असते बहीण ... 
ती फक्त बहीण नसून एक मैत्रीण मैत्रीण, आई, मार्गदर्शिका, सहकारी इत्यादी भूमिका पार पाडते, ती असते बहीण ... 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...